
सावंतवाडी : येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती शीला चंद्रकांत वराडकर (वय 87) यांचे गुरुवारी (ता.6) पुणे येथे निधन झाले. शहरातील गुलमोहर काँलनी येथील मूळ निवासी श्रीमती वराडकर ह्या सध्या पुणे येथे मुलगा विनोद यांच्या सोबत राहत होत्या. श्रीमती वराडकर यांनी शहरातील जि.प.शाळा क्रमांक चार मध्ये सेवा बजावली होती. कळसुलकर शाळेचे पर्यवेक्षक सुबोध वराडकर यांच्या त्या काकी होत. त्यांच्या मागे एक मुलगा विनोद आणि एक मुलगी विजया असा परिवार आहे.











