सेवानिवृत्त शिक्षक जे. जे. दळवी यांचे निधन

Edited by:
Published on: August 04, 2024 08:24 AM
views 293  views

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावचे सुपुत्र तथा कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक जे. जे. दळवी यांचे कणकवली येथील निवासस्थानी शनिवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी 4 ऑगस्टला सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव कळसुली गवसेवाडी येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता कळसुली भोगनाथवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जे. जे. दळवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच कळसुली पंचक्रोशीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी व मिथिल दळवी यांचे ते वडील होत.