सेवानिवृत्त शिक्षक जी. एन. नाईक यांचे निधन

Edited by: दीपेश परब
Published on: January 06, 2023 18:20 PM
views 434  views

वेंगुर्ला : वेतोरे - कराडेवाडी येथील रहिवासी तथा रा. कृ. पाटकर हायस्कूलचे सेवानिवृत्त कला शिक्षक गुरुनाथ नागेश नाईक उर्फ जी. एन. नाईक (वय ८१) यांचे ५ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने वेतोरे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वेतोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.