
बांदा : दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या निवृत्त कर्मचारी यांचा स्वानंदी परिवाराचा स्नेह मेळावा उत्साहात पडला. 07 जानेवारी 2026 रोजी आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर बांदा इथं हा मेळावा झाला. भेडशी, आयी, कुडासा, बांदा, डेगवे, असनिये, मडुरा, पिकुळा, मुंबई या शाळांमधून निवृत्त झालेले मुख्याध्यापक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले होते.
सुरआनंदी- स्वरआनंदी हा संगीत मेजवानीचा बहारदार कार्यक्रम श्री शहाजहां शेख व त्यांचे साथीदार यांनी सादर केला. श्री प्रकाश पाणदरे हे आजच्या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष होते. हनुमंत मालवणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गुरुनाथ नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले.
स्वानंदी परिवारचे कार्यकारी मंडळ व व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश वंदन करून स्नेह मेळाव्यास प्रारंभ झाला. सुधीर बांदेकर यांनी आभार व्यक्त केल्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील वर्षांतील स्नेह मेळाव्याचे आयोजन भेडशी येथे करण्यात येणार आहे.










