सेवानिवृत्त जिल्हा बँक कर्मचारी महेश चिटणीस यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2025 20:23 PM
views 248  views

सावंतवाडी : सेवानिवृत्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी महेश चिटणीस (वय ७५)यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे किशोर चिटणीस यांचे वडील होत.