आचिर्णेतील निवृत्त कॅप्टन आत्माराम रावराणे यांच निधन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 28, 2024 09:55 AM
views 271  views

वैभववाडी : आचिर्णे येथील भारतीय सैन्य दलाचे निवृत्त कॅप्टन आत्माराम विनायक रावराणे वय (९५) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.आज (ता.२८) पहाटे ५ वाजता प्राणज्योत मालवली. आत्माराम रावराणे यांनी भारतीय सैन्यदलात २०वर्षे सेवा केली.भारत-चीन,भारत-पाकीस्तान या दोन्ही युद्धावेळी ते सैन्य दलात कार्यरत होते. सैन्यदलात त्यांनी कॅप्टन व सुभेदार या पदावर काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.