
सावंतवाडी : माजगाव खोतवाडा येथील रहिवासी आणि भारतीय वायुदलाचे सेवानिवृत्त जवान शांताराम भगवान सावंत (वय ६६) यांचे आज वास्को येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
ते आसारामबापू यांचे शिष्य होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वास्को येथे एक्स-सर्व्हिसमन म्हणूनही सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतण्या, दोन विवाहित बहिणी आणि भावोजी असा परिवार आहे. पत्रकार शुभम सावंत यांचे ते काका होत.