
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे. तो अखंड तेवत ठेवण्यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेने 'शिवसंस्कार' नावाचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराजांचे विचार, जिजाऊंचे संस्कार आणि तो सुवर्ण शिवकाळ उमलत्या पिढीच्या मनामनात रुजावा, त्या विचारांचे सातत्याने मंथन व्हावे आणि सशक्त मनाची पिढी, शिव विचारांचा अमूल्य ठेवा घेऊन या समाजात वावरावी. या उदात्त हेतूने मातृभूमी शिक्षण संस्थेने हे पाऊल उचललेले आहे.
समाजात सध्या होत असलेले अत्याचार, आचार विचार पाहिले तर आज शिवविचार ही काळाची गरज बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यापलीकडे महाराज समजावेत, प्रत्येक मुलाच्या मनात उमजावेत. शिवजयंती ही एका दिवसाची नसून ३६५ दिवसही शिवाजी महाराजांचे विचार जागृत राहावे, हे 'शिवसंस्कार'चे प्रमुख उद्दिष्ट होय. शिवसंस्कारच्या स्पर्धेकडे प्रत्येक शिवभक्ताने केवळ स्पर्धा म्हणून पाहू नये, शिवकार्य म्हणून प्रत्येकाने यात मोलाचा वाटा घ्यावा. स्पर्धा म्हणजे फक्त निमित्त आहे. म्हणूनच वर्षभरामध्ये ऐतिहासिक घटनांना उजाळा देऊन आत्ताच्या समाजाला योग्य दिशा मिळावी हा प्रयत्न संस्था करीत आहे. महाराजांच्या जिवलग मावळ्यांचा पराक्रम ही मुलांना अभ्यासता येईल व त्यांचे पुण्यस्मरण होईल,असे आवाहन मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनाल लेले यांनी कळविले आहे.
छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षा सन २०२३ निकाल -
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक - गगन सत्यजित लेले - गुण ९६, (कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), द्वितीय - पियुषा उमाजी राणे (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) गुण ९५, तृतीय - वैभवी नारायण केळूसकर, गुण - ९२ (एस. एल. देसाई विद्यालय, पाट).
उत्तेजनार्थ - वैष्णवी समीर गावकर, गुण - ९०, श्रद्धा श्रीमाराम गावडे, गुण - ८९, कृपा मुणेश वारंग - ८९
(नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा), वेणू अजित सावंत - ८६ (कळसूलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), अनुष्का अनिल तेली - ८६ (माडखोल नं. ३ धवडकी), रसिका लक्ष्मण झाड -८६ (एस. एल. देसाई विद्यालय, पाट), विभव विरेश राऊळ - ८४ (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), मुग्धा प्रशांत टोपले - ८४ (जि. प. पूर्ण प्राथ. शाळा सावंतवाडी नं. २. सावंतवाडी), कृतिका किरण पालव - ८३, पूर्वा प्रसाद गावडे - ८३ (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), वेदांत विठ्ठल दराडे - ८१ (अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे नंबर १ ), नम्रता नागेश सावंत - ८१, (माडखोल नं. २, धवडकी)
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे निबंध स्पर्धा
प्रथम - अनिकेत लक्ष्मण सावंत (बांदा, सावंतवाडी), द्वितीय - यशवंत परशुराम वस्तवाडकर (वास्को, गोवा), तृतीय - विलास केशव प्रभू (डिचोली, गोवा),
उत्तेजनार्थ - सावित्री साजरो घाडी (म्हापसा, गोवा), संगीता वसंत राऊळ
(मळगाव, सावंतवाडी)
छ. शिवाजी महाराज पोवाडा स्पर्धा-
प्रथम - सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (बांदा), द्वितीय - दीक्षा पराग टीळवे (सावंतवाडी), तृतीय - श्रेष्ठा सचिन फडके (मार्केल, गोवा), उत्तेजनार्थ - प्रांजल राहुल पुराणिक.
वेशभूषा स्पर्धा-
लहान गट -
दीप महेश सावंत - प्रथम (उसगांव - फोंडा, गोवा), श्रीवर साईनाथ कुंदेकर - द्वितीय (दोडामार्ग), विर जनार्दन नाईक - तृतीय (करमाळी, गोवा), संस्कार प्रकाश गावकर - उत्तेजनार्थ (म्हावळेंगे, गोवा).
मोठा गट -
आरोही दीपक वेरेकर - प्रथम (फोंडा गोवा), निधी सागर नाईक - द्वितीय (दोडामार्ग), आद्विक विशाल आसोलकर - तृतीय (पणजी, गोवा), उत्तेजनार्थ - सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (बांदा),
खुला गट - प्रथम - भक्तेश नागेश नाईक
(पेडणे, गोवा)
वक्तृत्व स्पर्धा -
मोठा गट - सिद्धी प्रवीण फळदेसाई - प्रथम, नैतिक निलेश मोरजकर - द्वितीय, नील नितीन बांदेकर - तृतीय, समई सुदन सुर्लकर.
खुला गट -
प्रथम क्रमांक - सौरभ सुनील जोशी (सांगली).
चित्रकला स्पर्धा -
पियुषा उमाजी राणे - प्रथम (सावंतवाडी), पूर्वा सचिन जाधव - द्वितीय, (सावंतवाडी), सर्वेश मधुसूदन खांबल - तृतीय, (दोडामार्ग)