'शिवसंस्कार' च्या आंतरराज्यीय स्पर्धांचे निकाल जाहीर !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 07:04 AM
views 201  views

सावंतवाडी : शिवसंस्कृतीचे जतन व शिवविचारांचे मंथन हा विचार व आचार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या चारही राज्यांमध्ये विविध ऑनलाइन स्पर्धांमार्फत वर्षभर पोहचवणाऱ्या 'शिवसंस्कार' च्या सर्व स्पर्धांमध्ये  विजेते व सहभागी झालेल्या स्पर्धकांचे शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर व संस्थाध्यक्ष डॉ सोनल लेले, सदस्य ऍड सोनू गवस, पत्रकार संदेश देसाई, प्रा रुपेश पाटील, प्रा सुभाष गोवेकर या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात. 

यात राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा शिशुगट  प्रथम दीक्षा पराग टिळवे, सावंतवाडी द्वितीय शिवण्या नरेंद्र पाटील, बेळगाव

तृतीय-अनिषा अंकुर ठाकूर, ठाणे उत्तेजनार्थ-गौरी पुरुषोत्तम शेणई, गोवा यांनी तर बाल गट प्रथम-स्पृहा सुमित दळवी,दोडामार्ग

द्वितीय- गायत्री पुरुषोत्तम शेणई, गोवा तृतीय- स्वरा समीर मळीक, गोवा उत्तेजनार्थ-निधी वसंत राऊळ,मळगाव यांनी प्राप्त केला.

मोठ्या गटात प्रथम- आरोही दीपक वेरेकर, गोवा द्वितीय- रुद्रा प्रसाद नाईक, कुडाळ तृतीय- सिद्धी प्रवीण फळदेसाई

उत्तेजनार्थ-आर्वी सचिन जाधव,सावंतवाडी यांनी पटकावला. दरम्यान, जिजाऊ,शिवबा वेशभूषा - माता पालक गट प्रथम - सौ रोशनी गजानन पाटील, चि स्वराज गजानन पाटील, बेळगांव द्वितीय - सौ.रीना निलेश मोरजकर, चि नैतिक निलेश मोरजकर, बांदा

तृतीय- सौ प्रमिला  फळदेसाई, कु सिद्धी फळदेसाई, गोवा उत्तेजनार्थ- सौ साक्षी वाडकर, चि सक्षम वाडकर, आरोस, दांडेली यांनी प्राप्त केला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे निबंध स्पर्धेत प्रथम- सौ साक्षी संतोष टिळवे, सावंतवाडी द्वितीय- श्रीमती शुभेच्छा संदीप सावंत, बांदा तृतीय -श्रीमती नीता नितीन सावंत, शिरशींगे उत्तेजनार्थ-सौ संगीता वसंत राऊळ, मळगाव. यांनी तर माझाआवडता मावळा लहान गट प्रथम - स्वराज गजानन पाटील, बेळगांव-संताजी घोरपडे द्वितीय - स्पृहा सुमित दळवी, हंबीरराव मोहिते तृतीय-दीप महेश सावंत-बाजीप्रभू देशपांडे उत्तेजनार्थ- स्वरा समीर मळीक-तानाजी मालुसरे यांनी मोठा गट प्रथम - आरोही दीपक वेरेकर - शिवा काशीद द्वितीय - नैतिक निलेश मोरजकर-मुरारबाजी देशपांडे तृतीय- इशा संतोष टिळवे - बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चित्रकला स्पर्धेतपहिला गट प्रथम- मानसी मिलेश माळजी, सावंतवाडी द्वितीय - आयुष जितेश वेंगुर्लेकर, सावंतवाडी तृतीय - प्रणव सदाशिव साधले, सावंतवाडी उत्तेजनार्थ-साध्वी मनोज कुडाळकर-कुडाळ यांनी तर  खुला गटात प्रथम - पियुष नारायण निर्गुण, सावंतवाडी. यांनी प्राप्त केला. जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्ष ही ऑफलाईन घेतली गेली. शिवचरित्रावर १०० गुणांची  जिल्हास्तरीय लेखी परिक्षा विविध केंद्रांवर घेण्यात आली. प्रथम-चि सहर्ष सतीश धुमाळे, ९८गुण, यशवंतराव भोसले स्कुल              द्वितीय-कु पूर्वा प्रसाद गावडे,९७ गुण तृतीय-कु गार्गी सचिन कांबळी,९६ गुण,तळवडे तसेच विविध शाळांमधील १५ विद्यार्थी उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचे शिवसंस्कार व अनेक स्तरांवर अभिनंदन होत आहे. सर्व विजेत्यांना वार्षिक सन्मान सोहळ्यात विशेष अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून त्यासंबंधित सर्व सूचना  शिवसंस्कार तर्फे लवकरच देण्यात येतील .