
सावंतवाडी : श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे १२ वीचा निकाल ९१.१३ टक्के एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात ३४ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत कला शाखेतून सानिका गोसावी ७१.१७ टक्के प्रथम, द्वितीय सिद्धेश जाधव ६१.१७ टक्के तर आत्माराम परब ५९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष श्री विष्णू पेडणेकर, सी ईओ श्री श्रीकृष्ण पेडणेकर , खजिनदार डॉ. कांडरकर, व सर्व पदाधिकारी; प्राचार्य श्री प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक श्री दयानंद बांगर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक सर्वांकडून अभिनंदन केले आहे.