खारेपाटण महाविद्यालयाचा बी. कॉमचा निकाल ९६.२९ टक्के

Edited by:
Published on: May 15, 2026 15:21 PM
views 11  views

खारेपाटण : खारेपाटण येथील के.पी.एस.पी.एम. संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बी.कॉम. परीक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहीर केला असून महाविद्यालयाने ९६.२९ टक्के इतका उल्लेखनीय निकाल प्राप्त केला आहे. या परीक्षेत कु. जुल्फा गफ्फार काझी हिने ९.०५ सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. फिरदौस मोहम्मदअली काजी हिने ९.०० सीजीपीए मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. अनिकेत दशरथ जाधव याने ८.७० सीजीपीए संपादन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण शेठ लोकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. मोहम्मदअली मुन्शी, परीक्षा व मूल्यमापन विभागप्रमुख प्रा. प्रणय माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.