पालकमंत्री २५ गाड्या घेऊन फिरतात

वैभव नाईक यांची टीका
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 15, 2026 13:55 PM
views 32  views

कणकवली : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाहनांचा वापर करू नका असे सांगत आहेत तर सिंधुदुर्गात पालकमंत्री, खासदार आणि आमदार हे कालच जवळपास २५ गाड्या घेऊन फिरत होते, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कणकवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने काढलेल्या मोर्चा नंतर पत्रकारांशी श्री नाईक बोलत होते. सत्ताधाऱ्यांच्या कृतीमुळे लोकही यांची खिल्‍ली उडवायला लागलेत. कधीतरी लोकांचा उद्रेक होईल आणि लोकच रस्‍त्‍यावर उतरतील, असेही नाईक म्‍हणाले.