इतर उमेदवाराचे नांव, नेमुन दिलेल्या चिन्हाची नमुना पत्रिका छापण्यास निर्बंध..!

Edited by:
Published on: March 18, 2024 13:02 PM
views 182  views

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. याअनुषंगाने नमुना मतपत्रिका छपाईवर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे.  

निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांतेतत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व  माध्यमाव्दारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालण्याची गरज आहे.  इतर उमेदवारचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.  वरील प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दि. 6 जून 2024 पर्यंत निर्बंध घातले आहे.