
देवगड : १ मे पासून देवगड तालुक्यातील किंजवडे येथील पावणाई मंदिर चा जीर्णोध्दार सोहळा संपन्न होत आहे.यानिमित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील किंजवडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणादेवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा १ ते ३ मे या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यात २९ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता कलश व मूर्ती मिरवणुकीचा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १ मे रोजी सकाळी ८:०० वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता आवाहन पूजन, वास्तू होम व आरती, दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिक सुस्वर भजने, ७:०० वाजता महाआरती, रात्री ९:०० वाजता पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई बुवा प्रमोद हर्याण आणि प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई बुवा प्रमोद धुरी यांचा पारंपरिक डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.२ मे रोजी सकाळी ८:०० वाजता कलशारोहण सोहळा, धार्मिक विधी व आरती, दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिक सुस्वर भजने, ७:०० वाजता महाआरती, रात्री ९:०० वाजता जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा होणार आहेत.
३ मे रोजी सकाळी ८:०० वाजता आवाहित देवता पूजन, कुंकुमार्चन, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिक सुस्वर भजने होणार आहेत.
सायंकाळी ७:०० वाजता २ महाआरती, ८:०० वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. तसेच रात्री १०:०० वाजता राठीवडे सुतारवाडी येथील श्री विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग होणारआहे.यासोहळ्यासउपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन परबवाडी ऐक्यवर्धक मंडळ, किंजवडे आणि मुंबई यांनी केले आहे.