तिरंगा रॅलीला प्रतिसाद..!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 14:22 PM
views 124  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेच्या "हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमे अंतर्गत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आयोजित मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दाखवल्यानंतर ही रॅली जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानापासून रॅली निघाली. 

या रॅलीमध्ये माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,सावंतवाडी नगर परिषदेचे  प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, स्वच्छता विभाग प्रमुख रसिका नाडकर्णी शिवप्रसाद कुडपकर प्रसाद भटवाल प्रदीप सावरवाडकर बाबा शेख,दीपक म्हापसेकर,भाऊ भिसे अक्षय पंडित गजानन परब श्री पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्याशिवाय सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर,विजय देसाई  जिल्हा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अमोल टेंबकर तालुका कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे भुवन नाईक आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष प्रमोद भागवत माजी सचिव प्रवीण परब म्हापसेकर, अनंत उचगांवकर, सोमनाथ जिगजींन्नी माजी अध्यक्ष डॉ विनया बाड अॅड सायली दुभाषी याशिवाय लायन्स क्लब लायनेस क्लब समता महिला मंडळ रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.ही बाईक रॅली सालईवाडा टोपीवाला हायस्कूल तंत्रनिकेतन ते सावंतवाडी शिरोडा नाका येथे पर्यंत गेली तेथून निंबाळकर पीर ते होळीचा खुंट जुना बाजार ते आत्मेश्वर मंदिर त्यानंतर माठेवाडा येथील परूळेकर हॉस्पिटल ते कोलगाव दरवाजा, कोलगाव दरवाजा ते सावंतवाडी संस्थानकालीन राजवाडा, जिल्हा परिषद शाळा नंबर ४ येथून गोठण ते महादेव भाटले शिल्पग्राम पर्यंत रॅली गेली त्यानंतर ही रॅली पुन्हा जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये येऊन विसर्जित झाली. या रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लोकांच्या हदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाब‌द्दल जागरुकता वाढवणे, हे सदर उपक्रम राबविण्यामागील मुळ कल्पना होती. त्याअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी सावंतवाडी शहरात सामाजिक संघटनांच्या रॅलीचे आयोजन सकाळी ८ वा करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात आणि सांगता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउदयान येथे करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी केले.