प्राथ. शिक्षक संघाच्या सराव स्कॉलरशिपला प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2025 18:04 PM
views 71  views

सावंतवाडी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना या मोफत सराव परीक्षेचा लाभ होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी गतवर्षीप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला.         

एकच ध्यास गुणवत्तेचा विकास हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच त्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी सातत्याने सक्रिय कृतीशील सहभाग घेऊन प्रयत्नशील असलेली संघटना असून गौरवास्पद कार्य करत आहे. यासाठी विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे शिखर गाठण्यासाठी हीच मोठी संधी आहे. यातून पुढील दिशा निश्चित होण्यास मदत होईल यासाठी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी शुभेच्छा देऊन आपले मत व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाला एक इतिहास असून केली पंचवीस वर्षे सातत्याने या शिष्यवृत्ती मोफत सराव परीक्षेचे आयोजन करून मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवून समाजातील सर्वच घटकांना आदर्श असलेली संघटना आहे. या संघटनेच्या वतीने मोफत सराव परीक्षेचा आदर्श इतर संघटनेनी घ्यावा ही बाब समाजप्रिय ठरली आहे असे मत राज्य संघटनेचे उपाध्यक्ष म.ल. देसाई यांनी व्यक्त केले.         

शैक्षणिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याच्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबवून शिक्षणाला पूरक असे उपक्रम राबविण्यात ही संघटना यशस्वी ठरत आहे. या  शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा कोणत्याही प्रकारचा शुल्क नसून पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य गुणवत्तेत सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचा ठसा दिसून येत आहे. या सराव परीक्षेत  जिल्ह्याच्या गुणवत्ता  यादीतील पहिल्या टॉप टेन विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग ॲवॉर्ड देऊन विशेष कार्यक्रमात यथोचित सन्मान केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी आणि प्रोत्साहन देऊन अखिल शिक्षक संघटना पालकांना, विद्यार्थ्यांना जवळीक वाटते हा विश्वास गेली पंचवीस वर्षे या संघटनेच्या माध्यमातून राबवलेल्या अनेक विद्यार्थी हिताय उपक्रमातून पालकांना लक्षवेधी ठरली असून गत वर्षीप्रमाणे सुद्धा या वेळी उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळाला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन व्हावे व पुढील दिशा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एम.पी.एस.सी., यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उद्याचा अधिकारी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निर्माण होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेतील सुपीकता वाढवण्यासाठी प्रगतशील असलेली अखिल प्राथमिक शिक्षक संघटना ही सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी जिल्हा सचिव बाबाजी झेंडे, बांदा केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत , केंद्र मुख्याध्यापक  शांताराम असणकर, महिला सेल अध्यक्षा शुभेच्छा सावंत, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटनना शाखा सावंतवाडी अध्यक्ष विजय गावडे ,सचिव रुपेश परब ,कार्याध्यक्ष अर्चना देसाई ,मनोहर गवस ,सुरेश काळे,  सौरभ खोत , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सिध्दे,गोंसलावीस, घोडगे, घाडी, सावळ,जे डी पाटील , मोरे, सपना गायकवाड, कांबळे, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .शिष्यवृत्ती सराव परीक्षा यशस्वी होण्यासाठी केंद्र संचालक ,पर्यवेक्षक तसेच पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन करून परीक्षा यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परब, प्रास्ताविक विजय गावडे तर आभार रुपेश परब याने मानले.