नवीन कुर्लीत नितेश राणेंच्या प्रचार सभेला प्रतिसाद

Edited by:
Published on: November 18, 2024 15:41 PM
views 121  views

कणकवली  : नवीन कुर्ली येथे आमदार नितेश राणे यांची प्रचार सभा पार पडली या वेळी नवीन कुर्ली गावातील दोनशे हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गावातील जेष्ठ नागरिकांनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले .

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांनी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली मध्ये झालेल्या कामांची माहिती देऊन आमदारांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी यापुढेही नवीन कुर्ली गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.

या वेळी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राजन चिके, अंबाजी हुंबे, राजेंद्र कोलते, अमित दळवी, सुरज तावडे, बूथ अध्यक्ष अतुल डऊर,बाळकृष्ण चव्हाण आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.