आंबा शेती मोहोर संरक्षण मार्गदर्शन सत्रास प्रतिसाद

Edited by:
Published on: November 29, 2024 18:56 PM
views 418  views

देवगड : मालवण मधून सर्व प्रथम आंब्याची पेटी नाशिकला पाठवणारे कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांचा सत्कार सोहळ्या निमित्त आंबा शेती मोहर संरक्षण मागदर्शन चर्चा सत्राचे देवगड वळीवंडे येथील साईश्रेया मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित मार्गदर्शन चर्चा सत्रात डॉ. उत्तम फोंडेकर आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले देवगड हापूस अस नाव नसेल तर त्या आंब्याला मार्केट मध्ये काडीचीही किंमत मिळत नाही देवगड ब्रँडमुळे मार्केट मध्ये आंबा चालतो नाहीतर त्याला कोणीही विचारत नाही. 

या वेळी मी कमी कालावधीत एकटा राहून संशोधन करत असे तसेच मोठे मोठे व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेत असे त्यामुळे त्यांच्याकडील ज्ञान आत्मसात केले पहिली पेटी राज्यातून जाणे आवश्यक होते आणि त्यासाठी मी प्रयत्न केले त्यासाठी मी सेंद्रिय शेती वर ६ महिने प्रशिक्षण घेतले,सूर्य चंद्र असेपर्यंत देवगड तालुक्याचे नाव आंब्यात तरी कोण मागे काढू शकत नाही देवगड नावावरच सर्व मार्केट मध्ये आंबा चालतो

बोगस औषधांचे प्रमाण वाढलेले दिसते त्यामुळेच एप्रिल मे महिन्यामध्ये लेंडीखत घालणं आवश्यक आहे.यावेळी आयोजित मार्गदर्शन चर्चासत्राच्या व्यासपीठावर देवगड कृषि तंत्र निकेतन प्राध्यापक विनायक ठाकूर,नैसर्गिक शेती सल्लागार महेश सावंत,व्यवस्थापक सुधाकर सावंत,माजी सभापती नंदू देसाई,दत्तू सावंत,उपसरपंच निलेशसावंत,प्रकाशसावंत,आंबा बागायतदार बाळा पारकर, मिलिंद शेट्ये आदी उपस्थित होते.या वेळी डॉ.फोंडेकर पुढे म्हणाले ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाडांना खूप मोहर येतो त्या मोहराला पावसापासून वाचवणे गरजेचे आहे.हे सर्व संशोधन करत असताना देवगड तालुक्यातील वळीवंडे येथील सुधाकर सावंत व महेश सावंत या दोन बंधूंचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.वसंत सम्राट या आंब्याचा मी शोध लावला त्याच पेटंट लवकर येईल आणि त्यासाठी मला राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.यावेळी देवगड कृषि तंत्र निकेतन प्राध्यापक विनायक ठाकूर,यांनी देखील उपस्थित आंबा बागायतदार शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन चर्चा सत्राचे नैसर्गिक शेती सल्लागार महेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मा.सभापती नंदू देसाई यांनी केले.या मार्गदर्शन चर्चा सत्रात मोठ्या संख्येने देवगड येथील आंबा बागायतदार उपस्थित होते.