
वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व श्री देवी सातेरी महिला मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि सीपीएए मुंबई, व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे आयोजन उत्सव मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर अणसुरचे सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कुंभार, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सातेरी महिला मंडळ अध्यक्ष सुजाता पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
महाआरोग्य तपासणी शिबिरात सीपीएए मुंबई यांच्या सहकार्याने विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १५८ नागरिकांनी लाभ घेतला. कान नाक घसा, रक्तदाब, स्तन व गर्भाशयाचे आरोग्य, पूर्ण शारीरिक तपासणी यांसारख्या सेवा देण्यात आल्या. या शिबिरात निता मोरे (कार्यकारी संचालक - कर्करोग तपासणी सेवा), डॉ. संजय घिलडिवाल (ईएनटी तज्ज्ञ), डॉ. सतीश काणेकर (सामान्य शल्यचिकित्सक), डॉ. रचना मेहरा (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. वीणा बोरकर (फिजिशियन), डॉ. शुभा माऊदगाल (कार्यकारी संचालक - विशेष प्रकल्प), मीनल परब (सहाय्यक संचालक) यांनी सेवा दिली. नेत्र तपासणी शिबिरात व्हिजन हॉस्पिटल गोवा चे प्रमुख आणि गोवा विधानसभा आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांच्या विशेष सहकार्याने १६१ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे नंबर तपासणे, मोतीबिंदू तपासणी आणि इतर नेत्ररोगांवरील सल्ला देण्यात आला. व्हिजन हॉस्पिटलचे वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ वेंकटेश कर्री आणि नेत्रतज्ज्ञ शाहजहान शेख (मुस्कान) यांनी तपासण्या केल्या.
या शिबिरास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उद्योजक दादासाहेब परुळकर, उद्योजक सुधीर झांट्ये तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष पप्पू परब यांनी भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. एकूण ३१९ नागरिकांनी या दोन्ही शिबिरांमधून लाभ घेतल्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. वेताळ प्रतिष्ठान व श्री देवी सातेरी महिला मंडळ, तुळस यांच्या सामाजिक भानातून आयोजित या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात उत्सव हॉल चे आनंद तांडेल यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सागर सावंत, महेश राऊळ, प्रदीप परुळकर,सद्गुरू सावंत , सुधीर चुडजी, प्रज्वल परुळकर, सचिन गावडे,अनिल परुळकर,मंगेश सावंत, आशिष पडवळ,सानिया वराडकर, विधी नाईक, वैष्णवी परुळकर, जान्हवी सावंत, अदिती तांबोसकर,हेमलता राऊळ,नाना राऊळ,माधव तुळसकर,केशव सावंत आणि श्री देवी सातेरी महिला मंडळ तुळस यांच्या महिलांनी मेहनत घेतली. स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.