पडेल इथं रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 08, 2024 19:33 PM
views 29  views

देवगड : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांचे वतीने पडेल येथे रक्तदान शिबीर आज सपन्न झाले. संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख प. पु. सद्गुरू सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शनानुसार नेहमीच मंडळाचे वतीने देशभरामध्ये अशी सामाजिक कार्ये आयोजित केली जातात. याचाच एक भाग म्हणून आज  पडेल येथे संत निरंकारी मंडळ, ब्रँच - पडेल, तालुका देवगड यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या वेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या प्रसंगी सरपंच भूषण पोकळे, पडेल गावाचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. वैभव वारीक, ग्रा. प. सदस्य प्रभाकर वाडेकर, निरंकारी मंडळाचे संयोजक विलास जाधव, मुखी रमेश बंडबे तसेच जिल्हा रक्त संक्रमण चे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व आरोग्य सेवक, तसेच देवगड तालुक्यातील सर्व निरंकारी सेवादल बंधू-भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.