कोलते हॉस्पिटल कसाल येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Edited by:
Published on: November 27, 2024 14:27 PM
views 437  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना आणि रोटरी क्लब, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर प्रशांत कोलते हॉस्पिटल,कसाल या ठिकाणी दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण २२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत कोलते आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सदस्य साई आंबेरकर उपस्थित होते.

तसेच रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस,डॉ. वैभव आईर, प्रथमेश सावंत उपस्थित होते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर, खजिनदार नितीन लिंगोजी आणि जॉईंट सेक्रेटरी दत्तप्रसाद गोवेकर, सदस्य विजय दळवी हे उपस्थित होते. या शिबिरासाठी ब्लड बँक सावंतवाडी चे श्री सातार्डेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या रक्तदानाच्या कार्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटने कडून आभार व्यक्त करत करण्यात आले.