
वेंगुर्ले : कला - संस्कृतीचा आदर आणि उत्सवप्रियता वेंगुर्ले वासीयांच्या रक्तातच आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला आलो आहे. या हॉस्पिटलनाका कला क्रीडा मंडळाचे उपक्रम नेहमीच स्तुत्य असतात त्यामुळे यापुढेही आपले सर्वतोपरी सहकार्य मंडळाला राहील अशी ग्वाही भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली.
येथील हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "आनंदोत्सव २०२६" ला युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली. यावेळी ऍड मनिष सातार्डेकर यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नवनिर्वाचित नगरसेवक रविंद्र शिरसाट, प्रितम सावंत यांच्यासहित मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्लेकरांच्या अभिजात कला क्रीडा संस्कृतीला न्याय देणारा हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला आयोजित " आनंदोत्सव २०२६ हा कार्यक्रम वेंगुर्ले येथे दिमाखात सुरु झाला आहे. या कार्यक्रमात दशावतार नाट्य प्रयोग, रणखांब लोककला मंच कणकवलीनिर्मित रंग मातीचे हा अभिनव लोककला कार्यक्रम, विविध नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी शेकडो रसिकांनी या लोककला महोत्सवाचा आनंद लुटला. तर या महोत्सवाला विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या.










