
दोडामार्ग : वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वीज ग्राहक संघटना दोडामार्ग आयोजित दोडामार्ग तालुक्यात महा मॅरेथॉन बैठकांना १५० पेक्षा जास्त वीज ग्राहकांच्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अभियंता श्री.वनमारे यांना दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांची पूर्णपणे माहिती देण्यात आली असून 27 मे पर्यंत सदर वीज समस्यांचा कृती आराखडा बनवून समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा अभियंता श्री.वनमारे यांनी वीज ग्राहक संघटना शिष्टमंडळाला दिले आहे.
मांगेली देऊळवाडी श्री सातेरी मंदिरात प्रथम बैठक पार पडली. यावेळी वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. नियमित वायरमन देण्यात यावा. पावसात सातत्याने वीज खंडित होते. त्यामुळे उपाययोजना राबवाव्यात, जंगलातून खोक्रल ते मांगेली देऊळवाडी येथे ३ किलोमीटर मुख्य रस्त्यावर लाईन देण्यात यावी, वाढलेले झाडेझुडपे देखील साफसफाई करण्यात यावी, तसेच मांगेली येथील चारही वाड्यात व्होल्टेज समस्या उद्भवते. मांगेली तळेवाडी येथे वारा येत असल्याने पावसाळ्यात लाईन समस्या उद्भवते वीज पुरवठा खंडित होतो. तर काही ठिकाणी विद्युत पोल बदलणे आवश्यक आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर बैठकीमध्ये आरडीएस योजनेतून खोक्रल ते मांगेली देऊळवाडी मुख्य रस्त्यावर लाईन देण्यात येईल तसेच वाढलेली साफसफाई करण्यात येईल इतर तालुक्यात ज्या पद्धतीत ट्रान्सफॉर्मर ची मागणी करण्यात येते तशी दोडामार्ग तालुक्यात कमी प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मांगेली ग्रामपंचायतच्याद्वारे होल्टेज क्षमता वाढवण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर ची मागणी करावी असे आवाहन जिल्हा सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांनी केले. तसेच सदर ठिकाणी झाडेझुडपे पाहणी करून साफसफाई करण्यात येईल असे आश्वासन दोडामार्ग सहाय्यक अभियंता पराग शिरधनकर यांनी दिले. मांगेली बैठकीला नारायण गवस, विजय गवस, तुकाराम गवस, कृष्णा गवस, विष्णू गवस, यशवंत गवस, महादेव गवस, विजय गवस उपस्थित होते.
खोक्रल ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या बैठकीत मांगेली गावाचा वीजपुरवठा खंडित होतो त्यावेळी खोक्रल गावाचा देखील वीज पुरवठा खंडित राहतो त्यामुळे सदर ठिकाणी उपाययोजना करावी अशी सातत्याने गेले ३ वर्ष मागणी होत आहे. मात्र अद्यापही त्या मागणीची पूर्तता होत नाही. सदर ठिकाणी एबी स्विच बसवण्यात येईल असे वचन दोडामार्ग अभियंता पराग शिरधनकर यांनी आश्वासन दिले . सौ.श्रुती गोपाळ गवस यांनी घराशेजारील विद्युत पोल बदल करावा सदर ठिकाणी कुठचीही जीवितहानी घडू शकते. यावेळी तात्काळ वायरमन मोहन गावडे यांनी पाहणी केली. विद्युत वाहिन्यावरीर साफसफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मोतीराम साबाजी गवस खोक्रल खालचीवाडी यांनी आपल्या घराशेजारील पोल बदलावा अशी यावेळी बैठकीत मागणी केली. सदर ठिकाणी पोल बदलण्याबाबत व्हेरिफाय करा व कनेक्शन पाहणी करून दोन्ही पोल बदलण्यात यावे असे आदेश जिल्हा सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांनी विद्युत विभागाला दिले. भूषण उसपकर -उसप यांची सातत्याने वाढविली वीज बिल आहे तसेच होल्टेज क्षमता ही कमी प्रमाणात येत आहे त्यामुळे दोन्ही समस्यांचे निवारण व्हावे अशी त्यांनी मागणी केली. यावेळी सदर ठिकाणी व्हाॅलटेज क्षमता तपासण्यात येईल व आपले विज बिल तपासणी करण्यात येईल असे वचन शिरधनकर यांनी दिले. खोक्रल बैठकीत माधुरी उसपकर, भूषण उसकर, अंजू गवस, रुची गवस, साईनाथ गवस, श्रुती गवस, लेखा गवस, अमित गवस, प्रशांत चारी, जयराम गवस, मोहन गावडे उपस्थित होते.
झरेबांबर ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या बैठकीत एन.एस.सी. स्कीम बाबत वीज विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असे आदेश श्री.भुजबळ यांनी दिले. तसेच इतर विद्युत कार्यालया ज्याप्रमाणे दशसूत्री फलक लावण्यात आले तसे फलक दोडामार्ग कार्यालयात देखील लावण्यात यावे अशी मागणी जिल्हा वीज ग्राहक संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केली. कर्मचाऱ्यांना इतर योजना बाबत कर्मचारी मार्गदर्शन बैठक घ्यावी असे आदेश भुजबळ यांनी विद्युत विभागाला दिले. दोडामार्ग तालुक्यात सातत्याने पावसाळ्यात वीज समस्या उद्भवत असल्याकारणाने काय उपाय योजना आहे असा सवाल दोडामार्ग सचिव भूषण सावंत यांनी उपस्थित केला. सदर ठिकाणी वझरे येथे सबस्टेशन होणार त्याची माहिती यावेळी दोडामार्ग सहाय्यक अभियंता शिरधनकर यांनी दिली. झरेबांबर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकावरील विद्युत वाहिन्या बदलून मिळाव्या अशी मागणी झरेबांबर सरपंच अनिल शेटकर यांनी मागणी केली. यावेळी वरिष्ठ पातळीवरून सदर वाहिन्या बदलण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती यावेळी सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांनी दिली. सदर बैठकीस सरपंच संघटना दोडामार्ग अध्यक्ष अनिल शेटकर, झरे-२ ग्रामपंचायत उपसरपंच अर्जुन आयनोडकर, दीपक राणे, उल्हास सावंत, वायरमन मयूर गवस उपस्थित होते.
दोडामार्ग शहरातील बैठक वीज कार्यालयात पार पडली. शहरातील सर्व विद्युत वाहिन्यावरील झाडेझुडपे साफ करावी अशी मागणी नगरसेवक समीर रेडकर यांनी केली. शेतातील लाईन व पोल बदलण्यात यावा अशी मागणी सातत्याने निवेदनाद्वारे केली आहे मात्र अद्यापही बदल करण्यात आले नाही अशी तक्रार वीज ग्राहक आशीर्वाद मणेरीकर यांनी केली, शहरातील सर्वांचे वीज रीडिंग घेण्यात येते मात्र आमचे व्यावसायिक मीटरची रिडींग न घेता बिले अदा करण्यात येतात अशी तक्रार भाजपा शहराध्यक्ष राजेश फुलारी यांनी मांडली. उसप गावात अवैधरीत्या विद्युत चोरी करण्यात येत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उसप करमळकरवाडी येथील वीज ग्राहक सुभाष खडपकर यांनी तक्रार दाखल केली. इन्सुलीतून दोडामार्ग तालुक्यात वीज पुरवठा होत असतो मात्र सातत्याने पावसात वीज पुरवठा खंडित होत असल्याकारणाने इन्सुलीथून दोडामार्ग तालुक्याला दोन वेळा ट्रायल घेण्यात येतात त्यावेळी तीन वेळा ट्रायल घेण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली. दोडामार्ग तालुक्यात विद्युत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी गॅंग उपलब्ध नसल्याकारणाने अनेक समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी नियमित कर्मचारी गॅंग उपलब्ध ठेवावी अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली. दोडामार्ग शहर व दोडामार्ग तालुक्यातील अनेक समस्या बाबत जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी दोडामार्ग अभियंता पराग शिरधनकर यांनी समर्थक उत्तरे न दिल्या कारणाने जिल्हा सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांना सदर समस्या कधी निवारण होणार असे नंदन वेंगुर्लेकर यांनी विचारले असता त्यांनी संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील असलेल्या समस्या बाबत कृती आराखडा बनवून नियोजन करण्यात येईल असे वचन दिले. मात्र जसजसा कालावधी उलटत गेला तसे अनेक वीज ग्राहकांच्या समस्या देखील वाढू लागल्या. नियोजित बैठकीपेक्षा तीन तास अनेक वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यातच वीजपुरवठा ३ वेळा वीज कार्यालयातच खंडित होत असल्या कारणाने वीज कार्यालयात बैठकीला विलंब होत गेला. जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी जिल्हा अभियंता वनमारे यांना घटनास्थळी दाखल होऊन वीज ग्राहकांच्या समस्या निवारण कशा करण्यात येईल असे आपण सांगावे असे भ्रमणध्वनीवर सांगितल्यानंतर श्री.वनमारे हे दोडामार्ग वीज कार्यालयात रात्री ८ वाजता दाखल झाले. यावेळी अनेक वीज ग्राहकांनी आपल्या समस्या कथन केल्या असून सक्षम अधिकारी हे दोडामार्ग तालुक्यात नसल्या कारणाने अनेक वीज समस्या भेडसावत आहेत. कळणे , सासोली, दोडामार्ग तिन्ही विभागांमध्ये सक्षम अधिकारी नसल्याकारणाने वीज कर्मचारी लक्षपूर्वक काम करत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर आपण लक्ष ठेवून सुरळीत कामकाज कसे होईल हे पहावे अशी माहिती यावेळी नंदन वेंगुलेकर यांनी दिली. दोडामार्ग तालुक्यात हा जंगलमय भाग असल्याकारणाने सदर संपूर्ण लाईनचे साफसफाई केल्यास 90% समस्या सुटतील अशी माहिती यावेळी सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांनी जिल्हा अभियंता वनमारे यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी दोडामार्ग तालुक्यात 12 मे पासून साफसफाई कर्मचारी व गॅंग दाखल होणार असून दोडामार्ग तालुक्यातील वीज वाहिन्यांची वाढलेले झाडेझुडपे साफसफाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली तसेच सदर दोडामार्ग तालुक्यातील समस्या बाबत आपण कृती आराखडा बनवून सदर समस्यांचे निवारण करण्यात येईल असे वचन जिल्हा अभियंता श्री.वनमारे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला वचन दिले. महा मॅरेथॉन बैठकांच्या आयोजनामध्ये दोडामार्ग शहरातील बैठक ही तब्बल ५ तास चालली. या मॅरेथॉन बैठकांना जिल्हा वीज ग्राहक संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, व्यापारी संघटना अध्यक्ष सागर शिरसाठ, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक समीर रेडकर, भाजपा शहराध्यक्ष राजेश फुलारी, भाजपा पदाधिकारी संजय सातार्डेकर, नगरसेवक चंदन गावकर, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर उपस्थित होते.