विद्याभारती गुरुकुल शिरळचा १०८ सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण

रथसप्तमी निमित्त उपक्रम
Edited by: मनोज पवार
Published on: February 05, 2025 19:38 PM
views 57  views

चिपळूण :  तालुक्यातील शिरळ येथील गुरुकुल मध्ये नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. गुरुकुल मध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने रथसप्तमीचे औचित्य साधून प्रत्येकी 108 सूर्यनमस्कारांचा संकल्प हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दैनंदिन नियोजनामध्ये सकाळचा योग या सत्रात विविध आसने त्याचबरोबर सूर्यनमस्काराचा सराव घेण्यात येतो. त्याच मुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने आणि चिकाटीने १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले.

या उपक्रमात एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गुरुकुल चे शिक्षक रोहन सिनकर आणि केतकी मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या नंतर रथसप्तमीचे आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्व आहे हे सांगण्यात आले.

आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने

आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते

अशी प्रार्थना करत संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुकुल मधील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यापुढेही अशाच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.