
सावंतवाडी : आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोसचे अध्यक्ष निलेश परब यांनी गेली सात वर्षे यशस्वी रित्या अध्यक्ष पद भूषवित आपल्या या कारकिर्दीत अनेक उपक्रम राबविले. गेली सात वर्ष अध्यक्षपदाला साजेसे असे महत्वपूर्ण योगदान दिले. सन २०१८ पासून त्यांनी यशस्वीरीत्या अध्यक्ष पद सांभाळले. त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांची परत २०२४ मध्ये बिनविरोध अध्यक्षपदावर निवड झाली होती.
मात्र, सध्या त्यांनी संस्थेला शाळेला वेळ देता येत नाही म्हणून आपल्या या वैयक्तिक कारणामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भविष्यात संस्थेसोबतच राहणार असून आपल्याकडून जे सहकार्य लाभेल ते आपण करणार असल्याचे सांगितले.