
सावंतवाडी : कोनशी गावाच्या रहिवाशांनी पिण्याच्या दूषित पाण्याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच लक्ष वेधलं. सध्या ग्रामपंचायतकडून पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येणार पाणी दूषित असून त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत आपल्या स्थरावरून योग्य ती उपाय योजना करण्यात यावी व आमच्या ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे अशी मागणी करण्यात आली.
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्याकडे हे निवेदन सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अर्जून सावंत, विठ्ठल गवस, अशोक सावंत, रामचंद्र गवस, लक्ष्मण गवस, चंद्रकांत सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.