दोडामार्गात 36 ग्रा. पं. च्या सरपंचपदाचं आरक्षण

आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड
Edited by: लवू परब
Published on: April 09, 2025 16:00 PM
views 394  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडेल जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक गावातील दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर, प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने उपस्थित होते. विविध गावातील सरपंच व पुढारी उपस्थित होते. 

सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग

कुडासे, घोटगे, तळकट, मोर्ले, वझरे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

कोलझर, खोक्रल, झरेबांबर, पाटये पुनर्वसन (सासोली खुर्द), आडाळी

अनुसूचित जाती महिला 

साटेली-भेडशी

अनुसूचित जाती प्रवर्ग

तेरवण-मेढे

खुला प्रवर्ग महिला

आयनोडे-हेवाळे, कळणे, कुंब्रल, कोनाळ, घोटगेवाडी, झोळंबे, परमे-पणतुर्ली, बोडदे, बोडण, मणेरी, मांगेली व विर्डी

खुला प्रवर्ग

आंबडगाव, आयी, उसप, कुडासे खुर्द, केर, झरे-२, तळेखोल, पिकुळे, फुकेरी, माटणे, मोरगाव व सासोली.