
कणकवली : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण अनुसुचित जाती – 2 अ.जा.महिला 3 , अनुसुचित जमाती 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग 08 – नागरिकांचा मागास प्रवर्गा महिला 09, खुला प्रवर्ग 21 – खुला प्रवर्ग महिला 21 याप्रमाणे 64 ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नगरवाचनालय हॉल (आप्पासाहेब पटवर्धन सभागृह) कणकवली नगरपंचायत जवळ होणार आहे.
ग्रामविकास विभाग, मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब दिनांक 13 जुन 2025 व तसेच मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक साशा/डेस्क -1(3)सरपंच आरक्षण सोडत/ 07/2025 दिनांक 7 जुलै 2025 अन्वये कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण
अनुसुचित जाती – 2 अ.जा.महिला 3 , अनुसुचित जमाती 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग 08 – नागरिकांचा मागास प्रवर्गा महिला 09, खुला प्रवर्ग 21 – खुला प्रवर्ग महिला 21 याप्रमाणे 64 ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी सन 2025 -2030 या कालावधीसाठी नागरीकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातील तसेच स्त्री राखीव व्यक्तीकरिता सरपंच पदे सोडत पध्दतीने (चिठ्या टाकून) आरक्षित करावयाची आहेत.
आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरवाचनालय हॉल (आप्पासाहेब पटवर्धन सभागृह) कणकवली नगरपंचायत जवळ, कणकवली येथे सोडत पध्दतीने (चिठ्ठया टाकुन) आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व संबंधीत सरपंच / उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि लोक प्रतिनिधी यांनी नोंद घेऊन वरील पदाचे आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे.असे आवाहन तहसिलदार कणकवली दीक्षांत देशपांडे यांनी केलेले आहे.