
रत्नागिरी : भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद घेण दोघांच्या अंगाशी आला. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला गेले होते. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दोघेजण या अजस्त्र लाटांमध्ये अडकले.
जीवघेण्या प्रसंगात काय करावे असे असताना या दोघांनी शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र, अजस्त्र लाटांमध्ये या दोघांमध्ये वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दोघांना देवदूत ठरले. जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दोघांना सुखरूप बाहेर काढले. जीवाची सुटका होताच या दोघांनी जीव वाचवणाऱ्दोया घा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.