
कुडाळ : विश्वभुषण,भारतरत्न -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व त्यांच्या खुल्या पत्रावर आधारीत 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' या पक्षाचा 68 वा वर्धापनदिन दिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली 3 ऑक्टोबर 2025 रोजी ऐतिहासिक क्रांती भूमी महाड येथे आयोजित करण्यात आला आहे,संपूर्ण देशभरातून रिपब्लिकन जनता व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांने उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव व पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांनी केले.
जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक कुडाळ येथील एम.आय.डी.सी.शासकीय गेस्ट हाऊस मध्ये जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली ,या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सहसचिव-रमाकांत जाधव उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक बांधणी बाबत तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
पक्षाचे जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष -सतीश सदाशिव कदम,जिल्हा उपाध्यक्ष-संजय यादव,जिल्हा खजिनदार - आनंद पेंडूरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका -ज्योती जाधव,महिला आघाडी जिल्हा खजिनदार-समिधा संजय निगुडकर,कणकवली तालुका अध्यक्ष- एस.के.तांबे, वैभववाडी तालूकाध्यक्ष-रविंद्र जंगम,मालवण तालूका सरचिटणीस-दिपक वराडकर उपस्थित होते.