
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती १ मे १९८१ रोजी झाली. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी उत्साहात साजरा होत आहे. नारुर गावातही या दिवसाचे औचित्य साधून येथील प्रगतिशील शेतकरी आणि नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत यांच्या शेतात सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या उपक्रमात गावातील तरुणांसह ओरोस येथील ज्ञानकुंज महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनचा समावेश होता. या उपक्रमात त्यांना नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, किशोर सरनोबत, सचिन ताटे, सागर परब, एकनाथ सरनोबत यांनी सहकार्य केले.