
सावंतवाडी : अतिवृष्टीमुळे सातत्याने पडझड होत असलेल्या घोलेवाडी पुलाची आज सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिलेल्या दुरुस्ती मटेरिअल व घोलेवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातून काँक्रिटीकरण करून दुरुस्ती करण्यात आली.
तसेच घोलेवाडी पूल व कुमयेचा व्हाळ दुरूस्तीसाठी लागणारे मटेरियल सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून व तालुका सरचिटणीस रुपेश आईर, गुरुनाथ आईर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यासाठी लागणारे सिमेंट जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामनदादा नार्वेकर यांनी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले.यावेळी ग्रामपंचायत सांगेली सरपंच श लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, बापू आईर,लक्ष्मण राऊळ, सुराज सावंत, मोतीराम सावंत, संतोष तावडे, विलास इळेकर,अशोक देसाई, मिथुन रेडीज, गुरु रेडीज, प्रकाश रेडीज, सचिन राणे, श्यामसुंदर (पिंटो) राऊळ तसेच बहुसंख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यास हातभार लावला.