रुग्णालयासमोरील खराब रस्त्याची दुरुस्ती

सामाजिक बांधिलकीचा पुढाकार
Edited by:
Published on: December 22, 2024 15:20 PM
views 141  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व रुपा मुद्राळे तसेच सावंतवाडी शहरामध्ये बांधकाम व्यवसायिक व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे दादा उर्फ शिवप्पा नग्नूर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय अपघात विभाग समोरील खडबडीत व खराब झालेला रस्ता दुरुस्ती करण्यात आला.  स्ट्रेचरद्वारे खडबडीत रस्त्यावरून अपघातग्रस्त रुग्ण हॉस्पिटलच्या आत घेताना रुग्णाला मोठ्या प्रमाणात हादरे बसायचे. ही बाब हॉस्पिटलच्या ठिकाणी सतत कार्यरत असणारे सामाजिक बांधिलकींचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांच्या लक्षात येताच त्यांनी हा रस्ता दुरुस्ती करण्याचं ठरवलं. तेव्हाच हॉस्पिटलमध्येच दादा कॉन्ट्रॅक्टर यांची भेट झाली. त्यांचा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्यांना या प्रसंगातून जावं लागलं. अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये या कारणास्तव त्यांनी या सेवाभावी कार्यासाठी पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्ती करून दिला. रुग्णांना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे व कामगारांचे आभार मानले आहेत.