
वैभववाडी : तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) वैभववाडी या संस्थेचे नामांतर करण्यात आले.२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी विजय साळसकर यांच नाव देण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाच तालुकावासींयाकडून कौतुक होत आहे.
तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)एडगाव येथे आहे.या संस्थेत विविध व्यावसायिक प्रकारांच प्रशिक्षण दिले आहे.आता या प्रशिक्षण संस्थेचे शासनाने नामांतर केले आहे.या गावचे सुपुत्र शहिद विजय साळसकर यांच नाव या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आले.शहीद साळसकर हे मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते.ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून परिचित होते.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यानी केलेल्या गोळीबारात ते शहीद झाले होते.त्यांच स्मारक देखील त्यांच्या मुळ गावी उभारण्यात आले आहे.आता शासनाने त्यांचं नावच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले आहे.याचा नामांतर सोहळा १४ऑक्टोबरला आम.नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे अशी माहिती भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी दिली.