
सावंतवाडी : तालुक्यातील रेशन दुकानात होणारे धान्य वाटप वेळेत व्हावे, तसेच या यंत्रणेत उद्भवणारे तांत्रिक अडथळे दूर करावेत, अशी मागणी येथील मनसेच्या वतीने माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी तहसीलदार अरुण उंडे यांच्याकडे केली आहे.
तहसीलदार उंडे यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत उपस्थितांनी श्री. उंडे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, मनोज कांबळी, स्वप्नील कोठावळे, प्रशांत तळकर आदी उपस्थित होते.