फोंडाघाट विश्रामगृहात अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 14, 2024 14:27 PM
views 133  views

कणकवली : कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कल्पनेतून भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे फोंडाघाट विश्रांतीगृह याठिकाणी राहिल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्रांतीगृहाच्या हॉलमध्ये  त्यांची प्रतिमा त्यांच्याच कवितांसह लावण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सर्वात पहिले विश्रांतीगृह म्हणून ओळख असणाऱ्या फोंडाघाट विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणानंतरचा लोकार्पण सोहळा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते व आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी 8 मार्च रोजी झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, उपअभियंता के. के. प्रभु राहूल पवार, नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, राजन चिके, बबन हळदिवे, उपसरपंच तन्वी मोदी, दर्शना पेडणेकर, विश्वनाथ जाधव, माजी सभापती सुजाता हळदिवे, सुनील लाड, भाई भालेकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.

सर्वगोड यांच्या पुढाकाराने फोंडाघाट विश्रांतीगृहाची मुख्य इमारत तसेच  शिपाई राहत असलेल्या खोलीचेही नूतनीकरण सुमारे ३५ लाख रुपये खर्चुन करण्यात आले आहे.