मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ''गाबीत समाजाचा इतिहास'' पुस्तकाचे प्रकाशन

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच होत असलेल्या गाबीत महोत्सवाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केले कौतुक
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2023 20:42 PM
views 144  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच गावित महोत्सव होत आहे या महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबईच्यावतीने जयद तयारी  करण्यात आली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "गाबीत समाजाचा इतिहास" या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र फाटक,अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर,कार्याध्यक्ष दिगंबर गांवकर,सरचिटणीस वासुदेव मोंडकर,खजिनदार नारायण आडकर,गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धूरत,सरचिटणीस बाळा मणचेकर हे उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये  पहिल्यांदा होत असलेल्या या महोत्सवाचे कौतुक केले. तसेच या महोत्सवामुळे  येणाऱ्या  पर्यटकांना आपण चांगल्या सोयी सुविधा देत आहात त्यामुळे कार्यक्रमाला शुभेच्छा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत