
कणकवली : कणकवली उपविभागातील कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील १३५ पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत प्रांताधिकारी तथा पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया अध्यक्ष जगदीश कातकर यांनी जाहिर केली. यात अनुसूचित जातीप्रवर्गासाठी १७ त्यापैकी पाच महिला, अनुसूचित जमातीसाठी १८ त्यापैकी पाच महिला, विमुक्त जाती अ साठी तीन त्यापैकी एक महिला, भटक्या जमाती ब साठी ८ त्यापैकी २ महिला, भटक्या जमाती क साठी ९ त्यापैकी ३ महिला व भटक्या जमाती ड साठी पाच त्यापैकी दोन महिला आरक्षण काढण्यात आले. एसबीसीसाठी ३ त्यापैकी एक महिला, ओबीसीसाठी २५ त्यापैकी आठ महिला, आर्थिक दुर्बलसाठी १४ त्यापैकी ४ महिला तर सर्वसाधारणसाठी ३३ त्यापैकी १० महिलांसाठी आरक्षीत झाल्या.
येथील तहसिलदार कार्यालयात जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत झाली. यावेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसिलदार तृप्ती देसाई, देवगडचे नायब तहसिलदार विवेव शेठ, नायब तहसिलदार एस. व्ही. राठोड आदी उपस्थित होते.
या तीन तालुक्यात महसूल गावानुसार पोलीस पाटील पदे मंजूर झालेली आहेत. यात एकूण २५८ पैकी १२३ भरती केलेली असून १३५ पदांसाठी आरक्षण सोडत झाली. यात लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी १७ अनुसूचित जमातीसाठी १८ विमुक्त जाती अ साठी ७ मटक्या जमाती व साठी ४ क साठी ९ तर ड साठी ५ पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी ३, ओबीसीसाठी २५ आर्थिक दुर्बल घटकासाठी १४ तर खुल्या प्रवर्गासाठी ३३ पदांची आरक्षण प्रक्रिया झाली..
यात सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. यात नेहरूनगर, दाबगांव, सांगवे, तिवरे, टेंबवाडी, मांडवकरवाडी, कोळपे, साकेडी, पुरळ, एडगांव, जांभवडे, नरडवे ही अनुसुचित जाती प्रवर्गासाठी तर अनुसुचित जाती प्रवर्ग महिलांसाठी सडुरे, कुवळे, नवीन कुर्ली, गडीताम्हाणे व कळसुली ही पोलीस पाटील पदे आरक्षीत झाली.
अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी हळवल तळेरे, तोरसोळे, आयनल, धोपटेवाडी, शिरवल, हुर्शी, शिवडाव, टॅबवली, नडगिवे, सांडवे, जुवेश्वर, गिर्ये अनपूर ही पोलीस पाटील पदे तर अनुसुचित जमाती महिलांसाठी मोहुळगांव, ठाकूरवाडी, शिवाजीनगर, तळेबाजार, गिर्ये रामेश्वर ही पदे आरक्षीत झाली.
विमुक्तजाती अ साठी ७ जागा आरक्षीत होणार होत्या. मात्र, तीनच गावात या प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने तीन पदे आरक्षीत करत शासन निकषानुसार उर्वरीत चार पदे भटक्या जमाती १ मध्ये समाविष्ठ करण्यात आली. विमुक्त जाती अ प्रवर्गासाठी वाघोटन व नारकरवाडी तर महिलांसाठी खुडी हे पद आरक्षीत झाले. भटक्या जमाती ब साठी कुसूर, उपनगर, आडबंदर, आनंदनगर, संभाजीनगर व फणसगांव तर या प्रवर्गात महिलांसाठी बांधवाडी व कुरंगवणे ही पदे आरक्षीत
झाली. भटक्या जमाती क साठी वायंगोशी, नावळे, गोवळ, शिराळे अरूळे, अरूळे, तरंदळे तर याच प्रवर्गातील महिलांसाठी मोहितेवाडी, नागसावंतवाडी व उत्तमनगर तर भटक्या जमाती ड साठी उपळे, मुटाट, वारगांव तर या प्रवर्गात महिलांसाठी राहटेश्वर व औदुंबरनगर ही पदे आरक्षीत झाली.
विशेष मागास प्रवर्गासाठी मौदे व विरवाडी तर या प्रवर्गातील महिलांसाठी कतवणेश्वर हे पद आरक्षीत झाले. ओबीसी प्रवर्गासाठी कळंबई, चिंचवाड, वाडातर, नवानगर, बागमळा, नाथवडे, तिथवली, तांबळडेग, लिंगेश्वर कासार्डे, नांदगाव, विठ्ठलादेवी शिवाजीपेठ, तिलॉट, नेर्ले, दिक्षी, लिंगडाळ, तर ओबीसी महिलांसाठी जांभळनगर, मळेगाव, पडवणे, कसबवाघोटन, नाद, खांबळवाडी, वाडाकेरपाई, कुंभारवाडी यांचा समावेश आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आखवणे- मोम नादपवाडी,वायंगणी, रामेश्वरनगर, मेहब्बुबनगर, कातवण घोणसरी, पिंपळगांव, निमतवाडी,
कालवी, कुंभवडे तर या प्रवर्गातील महिलांसाठी पिंपळेश्वरनगर, घापेकरवाडी, सुभाषनगर व श्रीनगर यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी फणसे, पावणाई, पाटथर, उल्हासनगर, कांजीर्डे, गांगेश्वर, धारेश्वर, वरवडे, ब्रह्मनगरी, भैरवगाव, यवतेश्वर, राजनगर, रांजणगांव, शास्त्रीनगर, हुंबरणे, सांगुळवाडी, भोम, मांगवली, मौदे, रिंगेवाडी, करूळ, भट्टीवाडी, जामदारवाडी, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जांभळगांव, गांधीनगर, बंदरगाव, भुसारवाडी, आवळेश्वर, खांबाळे, हेत, पाळेकरवाडी, कुंभारी व मोंडपार ही पदे आरक्षीत झाली आहेत.