
सावंतवाडी : कै. प्रभाकर मधुकर आराबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेकरिता 45 रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ 35 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला होता. त्या रकमेतून 40 हजार रुपये किमतीच्या रिलॅक्स चेअर हॉस्पिटललांना आज देण्यात आल्या.
या रिलॅक्स चेअर देण्यामागचा उद्देश पेशंटचे नातेवाईक रात्रीच्या वेळी खाली फरशीवर झोपतात. त्यांना इन्फेक्शन होऊ नये त्याकरिता प्रत्येक बेडला या रिलॅक्स चेअर देण्यात आल्या. ही संकल्पना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुकर यांनी मांडली होती. त्यासाठी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. याकरिता कळसुलकर हायस्कूलचे संचालक दत्तप्रसाद गोटस्कर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जावा यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या हाती सोपवला होता. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याने श्रीमती सुमेधा अरबेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. सावंत, डॉ. नंददीप चौडणकर, कार्यालयीन अधीक्षक रूपाली हेळेकर, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, राजेप्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, रवी जाधव, लक्ष्मण कदम, सिस्टर स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाचे हॉस्पिटलच्या अधीक्षकांकडून व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.