
दोडामार्ग : पणतूर्ली राऊळवाडी येथील श्री सातेरी देवी पंचायतन देवस्थानचा पुनः प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आज रविवार दि ११ मे रोजी विधिवत पूजनाने सुरवात करण्यात आली. उद्या सोमवार १२ मे ते बुधवार १४ मे या चार दिवसाच्या कालवाधित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या निमित्त रविवार ११ मे रोजी सकाळी ८. ०० वाजता यजमान देहशुद्धी देवताना सांगणे देऊन सुरवात करण्यात आली , गणपती पूजन, मानकऱ्यांकडून प्रारंभास सुरवात. संभार दान, देव पाषाण जळामध्ये ठेवणे, व दुपारी १. ३० वाजता महाप्रसाद, संध्याकाळी४. ०० वाजता महिलांचा विशेष कार्यक्रम,५. ३० वाजता संगीत धारा कुमारी दक्षता घोगळे असनीये हिचा कार्यक्रम, तर ७. ०० वाजता गावातील विशेष कार्यक्रम, व ८. ०० वाजता समय नृत्य व फुगडी महिला ग्रुप कासारवर्णे गोवा यांचा कार्यक्रम होणार आहे.