सिंधुदुर्गात पहिल्यांदाच हेल्प ग्रुपची रील्स स्पर्धा

शेवटची तारीख आणि हे आहेत नियम
Edited by: जुईली पांगम
Published on: August 28, 2023 15:22 PM
views 203  views

कुडाळ : सिंधुदुर्गात दहीहंडी बघायला जायची तर ती कुडाळच्या हेल्प ग्रुपची. सिंधुदुर्गात प्रथम दहीहंडी स्पर्धा भरवण्याचा मान याच ग्रुपला जातो. दरवर्षी विविध कार्यक्रम, आकर्षक देखावे असं या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. यंदा हेल्प ग्रुपचं 19 वर्ष आहे. हाच हेल्प ग्रुप यावर्षी हटके थीम घेऊन आलाय. दहीहंडीनिमित्त पहिल्यांदाच Reel स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.  


अशी आहे स्पर्धा 

  • हेल्प ग्रुप दहीहंडी असा स्पर्धेचा विषय आहे. 
  • हेल्प ग्रुपच्या इन्स्टा अकाऊंटला फॉलो करण गरजेचं 
  • Reel कोलॅब मध्ये टॅग करायला हवं
  • Reel पोस्ट करायची अंतिम तारीख 4 सप्टेंबर आहे. 

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस मिळणार आहेत. प्रथम पारितोषिक ३ हजार, द्वितीय 2 हजार असणार आहे. अधिक माहितीसाठी 9975552412 या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन हेल्प ग्रुपच्यावतीने करण्यात आलंय. 


हेल्प ग्रुप कुडाळच्यावतीने दहीहंडीनिमित्त केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक भानही जपलं जात. वीर जवानांना मानवंदना, स्त्री सक्षमिकरणाला प्रोत्साहन दिल जातं. ही परंपरा कायम राखत यंदाही भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गणेश वंदना, महिला ढोलपथक, महिला गोविंदा पथक, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, लाईव्ह कांतारा डान्स आकर्षण असणार आहे. तर मग येताय ना, सिंधुदुर्गातील सर्वात मोठी हेल्प ग्रुप कुडाळची दहीहंडी बघायला.