रामनवमीनिमित्त रील स्पर्धा

Edited by:
Published on: March 21, 2025 12:40 PM
views 308  views

कणकवली : श्री देव पाचोबा मित्र मंडळ डामरे यांच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित रील स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा प्रथमच डिजिटल माध्यमातून उत्सवाचे क्षण कैद करण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.

या स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे 

स्पर्धकांनी रामनवमी उत्सवाशी संबंधित रील तयार करून मंडळाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज (@shridevpachoba) सोबत कोलॅबोरेट करणे आवश्यक आहे.

विजेत्यांची निवड ऑडियन्स रिस्पॉन्स, रीलची मांडणी, एडिटिंग कौशल्य आणि सांस्कृतिक संदेश या निकषांवर करण्यात येणार आहे.

आकर्षक बक्षिसे 

प्रथम क्रमांक : ₹ १५,५५५/- + आकर्षक चषक

द्वितीय क्रमांक : ₹ ७,५५५/- + आकर्षक चषक

तृतीय क्रमांक : ₹ ३,५५५/- + आकर्षक चषक

एकूण बक्षीस रक्कम : ₹ २६,६६५/-

बक्षीस वितरण समारंभ  १२ एप्रिल २०२५ रोजी फोंडाघाट येथे होणार असून विजेत्यांना ठिकाणाची अचूक माहिती वेळेवर कळवली जाईल. अधिक माहितीसाठी 94236 82448 / 7722056111 / 9403558171 या क्रमांकावर संपर्क साधावा.