कोकणची अंबा रेडीच्या श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव !

Edited by: जुईली पांगम
Published on: December 11, 2023 15:56 PM
views 206  views

वेंगुर्ला :  रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली रेडीचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवारी दि. १२ डिसेंबर २०२३ ला होतोय. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. तसेच, फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे.   

सकाळी ६.००  वाजता श्री देवी व परिवार देवतांची पुजा, सकाळी ८.०० वाजता उत्सव मुर्ती सजावट, ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रम प्रारंभ, सकाळी ११.०० नंतर मंदिराच्या सभामंडपात देवीच्या साड्यांचा लिलाव, रात्रौं ११.३० वा. संबंधितांना तेल वाटप करणे व पुराण वाचन करणे, रात्रौं ११.४५ वा. देवी समोरील कुवाळा ज्योतीचा विधी, रात्रौं ठिक १२.०० वाजता  आकर्षक फटाकांच्या आतषबाजीत श्रीे देवीची पालखि प्रदक्षिणा, असे दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. 

रात्रौ वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. त्यामुळे तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आलंय.