
वेंगुर्ला : रेडीचं जागृत देवस्थान श्री देवी माऊलीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालीय. आज सोमवारी 12 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट या काळात साजरा होणार आहे.
यानिमित्त 14 ऑगस्ट पासून कनयाळवाडी, नागोळेवाडी, सुकळभाटवाडी, म्हारतळेवाडी आणि हुडावाडी या 5 पौराणिक कथेवर आधारित ढोल ताशाच्या तालावर व हरिनामाच्या गजरात दिंडीसहित चित्ररथ श्री देवी माऊली मंदिराकडे आणले जाणार आहेत. तसेच. देवी माऊलीची दररोज विविध रूपात आकर्षक फुल सजावटीसह पूजा बांधल्या जातात. 19 ऑगस्ट ला दहिकाला, समुद्रपर्यंत पालखी प्रदक्षिणा आणि सागराला नारळ अर्पण करून सप्ताहाची सांगतात होणार आहे. या हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय.