
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळ प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री क्षेत्र रेडी गजानन देवस्थानचा ४९ वा वाढदिवस समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या दिवशी श्री द्विभुज गजाननाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी पाहायला मिळाली.
रेडी श्री गजाननाच्या ४९ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त श्री गजानन देवस्थान रेडी नागोळेवाडी यांच्यामार्फत विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. पहाटे श्री गजाननावर अभिषेक करण्यात आला. यानंतर श्री सत्यविनायक महापुजा, आरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न आले. या आजच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर येथील असंख्य भाविकांनी श्री गजाननाचे दर्शन घेतले.