
वेंगुर्ला : श्री क्षेत्र रेडी श्री गजानन द्वितीय कलशारोहण वर्धापन उत्सव शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी सहा वाजता श्री गणेश मूर्तीवर अभिषेक सकाळी ९ वाजता श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने, दुपारी १२.३० वाजता आरती, त्यानंतर तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद तसेच सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत स्थानिक भजने व रात्री ८ वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ मोरे यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.