
वेंगुर्ले : रेडी येथील श्री देव ब्राम्हण बांदवा मंदिराचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दिनांक १५ मे २०२४ ते १६ मे २०२४ रोजी होत आहे. यानिमित्ताने बुधवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच गुरुवार १६ मे रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू समारंभ, भजने तसेच रात्री ७.३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केलं आहे.