
सावंतवाडी : आंगणेवाडीत होणाऱ्या श्री देवी भराडी मातेच्या जत्रौत्सवासाठी लाखो भाविकांनी मालवण नगरीत दाखल होत देवीचे दर्शन घेतले. गोवा, कर्नाटक राज्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी आदि जिल्ह्यांतून भाविक उपस्थित होते. मालवण एसटी डेपोतून विशेष गाड्यांची सोय या जत्रोत्सवानिमित्ताने करण्यात आली होती.
विशेष म्हणजे या एसटी बसेसना देखील नाविन्यपूर्ण पद्धतीने सजवित भराडी देवीच्या उत्सवासाठी सज्ज करण्यात आल होत. संतोष पाटील, सोहम परब यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. आंगणेवाडीच्या जत्रोत्सवात या लाल पऱ्यांचा थाट अनुभवायला मिळत होता.