
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार पासून मान्सूनचे आगमन झाले असून, शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्हा दिनांक ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या ९ जून रोजी जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून टोल फ्री क्रमांक १० ७७ मोबाईल क्रमांक ७४९८०६७८३५ व दूरध्वनी क्रमांक झिरो ०२३६२- २२८८४७ या नंबर वर आपत्कालीन सिरीज संपर्क साधावा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालया ठिकाणी ही नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.