माणगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात रेकॉर्ड डान्स स्पर्धा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 25, 2024 10:57 AM
views 98  views

कुडाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगांव सुवर्ण महोत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा शुक्रवार  16फेब्रुवारीला  सायंकाळी  6:00वाजता आयोजित करण्यात आली आहे

.लहान गट - वयोगट - 3ते 12 वर्ष मोठा गट-13 ते 20 वर्षे अशा दोन गटात होणार आहे. बक्षीस प्रथम क्रमांक -रुपये 5000/- व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक रुपये 3000/- व सन्मानचिन्ह  तृतीय क्रमांक -रुपये 2000/- व सन्मानचिन्ह असे आहेत.स्पर्धक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा. स्पर्धेला येताना आधारकार्ड आणणे अनिवार्य आहे. स्पर्धा फि 200/- रुपये राहील.स्पर्धेसंदर्भातील सर्व अधिकार स्पर्धा कमिटीला राहील. नाव नोंदणी  व स्पर्धा फि अगोदर जमा करावयाची आहे. अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहील वेळ मर्यादा कमीतकमी 3 मिनिटे व जास्तीत जास्त 5  मिनिटे राहील 

अधिक माहितीसाठी वसंत कदम 9284231274 बाबाजी भोई 8766594230 याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुवर्ण महोत्सवी संयोजन समिती, शाळा व्यवस्थापन समिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगांव यांनी केले आहे.